मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- दिनांक 20 /12/2022 रोजी, उस्मानाबाद शहरातील जागृती फाउंडेशन च्या वतीने,इयत्ता 11 वी च्या पुढील विद्यार्थ्यांसाठी संविधान दिनाच्या औचित्याने,संविधान शोध-बोध स्पर्धा परीक्षा 2022 चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना 20 डिसेंबर रोजी,उस्मानाबाद शहरातील व्हिजन करिअर अकॅडमी येथे मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवुन सम्मानित करण्यात आले.बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमास सुकूमार बनसोडे (पी.एस.आय),विजयकुमार दणाणे,अंगरखे आर. डी (शिक्षक),बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,साहित्यीक संतोष कांबळे,वंचितचे जि.महासचिव बाबासाहेब जानराव,व्हिजन करिअर अकॅडमीचे व्यवस्थापक शिलरत्न शिंदे,वंचितचे जि.सचिव सोमनाथ नागटिळक,जागृती चे अध्यक्ष विजय अशोक बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी कु. मिसळे प्रियंका उत्तम हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस,तसेच होळकर मुकुंद बाळासाहेब यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले,त्याच बरोबर साबळे ऐश्वर्या ज्योतीराम हिने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले,वरिल विद्यार्थ्यांना अनुक्रमे 3000,2000,1000 रुपये रोख रकमेसह सन्मानचिन्ह,प्रशस्तीपञ, अभिनंदन पत्र आणि आपले संविधान (राज्यपध्दती नव्हे, तर जीवनपध्दती) नावाचा ग्रंथ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवुन सम्मानित करण्यात आले.त्याच बरोबर संविधान शोध-बोध स्पर्धा परीक्षेमध्ये इंगळे दीक्षा,कांबळेदत्तात्रय, साखरे कोमल,गायकवाड मुकेश,रसाळ प्रियंका,सोनवणे सिद्धांत,शिंगाडे सारिका, ओहाळ पौर्णिमा,इंगळे आकांक्षा,माने गोपाळ यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले,ज्यामध्ये ग्रंथ,संविधान उद्येशिका फ्रेम व प्रशस्ती पञक यांचा समावेश होता.तर स्पर्धेमध्ये नालंदा जेटीथोर, कदम सीमा,साबळे आम्रपाली,हटकर ऋतुजा, वाघमारे प्रतीक्षा,वाघमारे स्नेहल,जाधव मयुरी,कांबळे ऋतुजा,कांबळे वंदना,काकणे अग्नी,व्हटकर राज,शितोळे काजोल,चौधरी पूर्वा,जाधवर ज्ञानेश्वरी,कांबळे सुरज,घोडके प्रथमेश,कदम पंकज,खुणे जोत्सना,गायकवाड तेजस्विनी,जानराव सानिया, कदम सुहानी या स्पर्धेत सहभागी मुलं व मुलींना प्रशस्ती पञक व ग्रंथ भेट देवून गौरविण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या मनोगता बरोबर विद्यार्थ्यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मस्के सी.के,सुनील वाघमारे,अजय बनसोडे,उबाळे अंकुशराव,
शिंदे प्रितम,धनंजय वाघमारे,नाईकनवरे सर,दत्ताभाऊ कदम,विजय सिरसाठे यांनी विविध बक्षीसे देवुन सहकार्य केले.तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित गायकवाड,बाबासाहेब कांबळे,महादेव एडके,संघा बनसोडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जागृतीचे अध्यक्ष विजय अशोक बनसोडे यांनी मानले.


0 टिप्पण्या