Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव (ध)रस्त्याच्या कामाकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी केले दुर्लक्ष;रस्ता बनवला निष्कृष्ट दर्जाचा!


मोहन जगजेकर सोशल मीडिया प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मों-9022898029


नांदेड:-धर्माबाद सध्या महाराष्ट्रात रस्ते आणि राजकारण यांचा दर्जा मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. एकदा बनवलेला रस्ता चार-सहा महिन्यात खराब होतोच कसा, हा प्रश्न राजकारणी, अधिकारी व कंत्राटदार यांच्याकडून कायमच प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे.

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत व इतर जिल्हा रस्ते विकास व नुतनीकरण 2020- 2022 अंतर्गत कारेगाव पिंपळगाव रस्त्याच्यी सुधारणा करणे मांजरम गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या जिल्हा परिषद च्या निधीतून धर्माबाद तालुक्यातील पिंपळगाव(ध) फाटा ते पिंपळगाव जाणारा रस्ता पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी गाकक-यांनी आमदार साहेबांकडे केली होती व त्या मागणीची दखल घेऊन आमदार साहेबांनी निधी मंजूर करून आणला व आपला चेला असलेल्या जवळच्याच बनावट गुत्तेदाराला ते काम दिले व मोठ्या थाटात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. व रस्त्याचे काम सुरू झाले व संपले पण परंतु, याकडे प्रशासनाचे रस्ता गुत्तेदार कसा बनवत या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. पिंपळगाव रस्त्याचे डांबरी करण केले परंतु या गुत्तेदाराने रोडवर मुरूम टाकून थातुरमातुर डांबर टाकून स्वतात रस्ता


बनवीला आहे. त्या चार पाच महिने अगोदर बनलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर खोल खड्डे पडल्याने रस्ते खडबडीत झाला आहेत. रस्त्यांची स्थिती फारच दयनीय झालेली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्या रस्त्याची चौकशी करून त्या गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. आपलाच जवळीक गुत्तेदार असल्याने धर्माबाद भागातील लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन दुर्लख करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्यक आहे. परंतु नेमकेया बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कित्येक दिवसांपासून पिंपळगाव सालेगाव येथील ग्रामीण जनता या खराब रस्त्यावरून वावरत होती गावाचा रस्ता बनवणारा या खुशीत लोक होती पण जसा रस्ता बनावा तसा रस्ता बनवणा-या गुत्तेदार न बनविलेल्या ने तेथील जनता विद्यमान आमदार यांच्या वर नाराज झाले आहे. रस्ता बनवल्यावर देखील काही महिण्यातच रस्ता खराब झाल्याने •मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. एकतर ग्रामीण भागात कित्येक दिवसांपासून रस्त्यांचा विकासाकडे पाहिले जात नाही. एखाद्या ठराविक वेळी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने रस्त्यास निधी मंजूर झाला तर मोठा गाजावाजा करतात. पत्रक काढतात, वर्तमानपत्रात बातमी छापून येतात. हे सर्व करून मोठी प्रसिद्धी केली जाते. निधीचे आकडेही लाखो-कोटीत असतात. मात्र, ही ग्रामीण रस्ते दुरुस्त करत असताना थातूरमातूर रस्त्यांची कामे केली जातात व नंतर सहा महिन्यातच रस्त्यांची दुर्दशा होते. असे थातूरमातूर रस्ते करण्यापेक्षा एकदाच संपूर्ण बजेटमध्ये रस्ते दर्जेदार करून दाखवले तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. पिंपळगावाचा रस्ता बनविणा- यासाठी आमदार साहेबांनी निधी मंजूर करुन आपला चेला असलेल्या जवळच्याच दोन नंबर धंदे वाल्या गुत्तेदाराला ते काम दिले नंबर दोन चा धंदा करणारा व्यक्ती नंबर एक चा रस्ता कसा करेल अशी जनतेत चर्चा सुरूच आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या