सरगम शाहारे विशेष प्रतिनिधी गोंदिया जिल्हा मो.9158172958
गोंदिया:- गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची गुरुवारी (दि. १५) सामान्य प्रशासन विभागाने बदली केली असून त्यांच्या जागेवर नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांची नियुक्ती केली आहे. गोतमारे यांना तात्काळ आपल्या पदाचा पदभार वरिष्ठांच्या सल्ल्याने इतरांना सोपवून गोंदियात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गोतमारे २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नागपूर विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले असून त्यांनी मेघालय राज्यातही आपली सेवा दिली आहे. तसेच यशदा पुणे येथेही त्यांनी काम केले आहे.


0 टिप्पण्या