Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध उपक्रमांचे आयोजन


संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्याची रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी - राजाभाऊ सरवदे

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


मुंबई :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दलित बहुजनांचे संघर्षनायक राष्ट्रीय लोकनेते असल्याच्या भावनेतून त्यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभर दरवर्षी दि.25 डिसेंम्बरला संघर्षदिन म्हणून साजरा होतो. याववर्षीही 25 डिसेंम्बर रोजी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर संघर्ष नायक नेते रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्याची रिपब्लिकन पक्षाने जय्यत तयारी केल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिली आहे. ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर एक वही एक पेन अभियान राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन ही रिपाइं तर्फे करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे प्रसिद्धिप्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.

मुंबईत प्रत्येक तालुक्यात ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा होणार असल्याची माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली असून दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वात ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम चेंबूर येथे युनिक हॉल; चेंबूर कॉलनी सत्तु मिठाई जवळ आयोजित करण्यात आला आहे.

ईशान्य मुंबई येथील पवई येथे ज्येष्ठ नेते बाळ (पवई) गरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील भाऊ पंडागळे यांच्या पुढाकारातून येथे शर्मा मैदानात रामदास आठवले चषक क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहे. मुंबईत विविध ठिकाणी रुग्णांना फळवाटप; बिस्कीट वाटप; चादर वाटप कपडे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दहिसर येथे ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती रिपाइं चे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी दिली आहे.

राज्यात सोलापूर येथे रक्तदान ; आरोग्य शिबीर; रुग्णांना फळवाटप असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

पिंपरी चिंचवड येथे केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून संघर्षदिन साजरा होणार असल्याची माहिती रिपाइं चे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी दिली आहे.

पश्चिम बंगाल येथे मृत्युंजय मलिक; राजस्थान मध्ये ऍड.नितीन शर्मा; राधाकृष्ण सैनी; आंध्र प्रदेश विजयवाडा येथे ब्रह्मानंद रेड्डी; हैद्राबाद तेलंगणा येथे रवी कुमार पसूला; नागेश्वराव गौड; प्रभूदास आदींनी ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून संघर्षदिन साजरा करीत असल्याची महिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या