Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरातील भीमसैनिकांनी कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांची काढली तिरडी.

चंद्रकांत पाटलाचा भांग विस्कटा आणि दोन लाख मिळवा..भीमसैनिकांची आरोळी

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


सोलापूर :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले,  डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.  सोलापुरातील भीमसैनिकानी राज्यपाल कोश्यारी, नामदार चंद्रकांत पाटील, सुधांशू त्रिवेदी आणि प्रसाद लाड यांची तिरडी यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही अंतयात्रा निघाली. मॅकेनिकी चौकात आल्यानंतर पोलिसांनी तिरडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भीमसैनिकांनी तिरडीला जोडेमार आंदोलन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन समाप्त करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह महापुरुषांची बदनामी करण्याचा डाव मनुवादी भाजपने आखला आहे. त्यांच्यावर जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कांत उघडे यांनी यावेळी दिला. 
या आंदोलनात कांत उघडे, अतिष बनसोडे, सोहन लोंढे, रत्नदीप (शील) भोसले, शांतीसागर सरवदे, आनंद भालेराव, मंटी बाबरे, संदीप सुरवसे, यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या