Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक .....

शाई फेकणारे तिघे ताब्यात....

चंद्रशेखर वाघमारे(पपु
निवळीकर)संपादक महा.चित्रा न्युज मो.८८८८११७९७५


पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली . एका कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तिनं शाई फेकली . यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं . चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील यावेळी शाई फेकणारा व्यक्ती करत होता . त्या व्यक्तिचं नाव अद्याप समजलेलं नाही . श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटन समाधीसाठी चिंचवड गावात आले होते , त्यावेळी त्यांना हे काळे झेडे देखील दाखवण्यात आले .
चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी ( NSUI ) आक्रमक झाले होते . महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरुन कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत . कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा करत भर रस्त्यात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला . यावेळी कार्यकर्त्यांनी हातात बाबासाहेब आंबेडकर , ज्योतीबा फुले यांचे फोटो हातात घेतले होते . ते फोटो दाखवत त्यांना काळे झेंडे देखील दाखवले . चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे . वेगवेगळ्या शहरात काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या