Ticker

6/recent/ticker-posts

पर्जन्यें पडावे आपुल्या स्वभावें।आपुलाल्या दैवें पिके भूमि।।



🚩 पर्जन्यें पडावे आपुल्या
            स्वभावें।
आपुलाल्या दैवें पिके भूमि।।
   पाऊस आपल्या स्वभावाप्रमाणे
सर्वत्र सारखा पडत असतो.......
  आपल्या प्रारब्धाप्रमाणे ती जमीन कमी अधिक प्रमाणात
पीक देत असते.....
   जसे बीज पेरावे त्याप्रमाणे फळ 
प्राप्त होत असते......
  ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे लाभ, हानी प्राप्त होत असतो........
  दिवा हा सर्वांना समान प्रकाश
देत असतो......
  तो धनी असो,सज्जन माणूस असो वा चोर असो,त्याला सर्व
सारखेच असतात......
   कावळे हे जनावरांच्या ढोपरा-
वरील कीडे खातात,तितर पक्षी 
दगड खात असतात......
  राजहंस पक्षी  मात्र मोती खातात.....
  तुकाराम महाराज म्हणतात,
अशाप्रकारे आपली आवड मुख्यतः कारणीभूत असून त्याला
अनुसरून नारायणाच्या कृपेचे फळ प्राप्त होत असते......
 🙏 *शुभ प्रभात* 🙏
🌻 *पंढरीचा वारकरी*🌻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या