दखल चित्रा न्युज चे बातमीची
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत पिंपळगाव/सडक ते धाबेटेकडी अंदाजे अंतर ५ किमी या रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले असून काम पूर्णत्वानंतर ५ वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम कंत्राटदार एन.एन. पुगलिया यांचेकडे आहे. या रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असले तरी दुरुस्तीकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याचे १८ नोव्हेंबर रोजी "पिंपळगाव ते धाबेटेकडी रस्ता अपघातास देतो निमंत्रण" या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित होताच कंत्राटदार खडबडून जागा झाला व दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
पिंपळगाव/सडक ते धाबेटेकडी ह्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे आवागमन करणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. रस्त्यावरील खड्डे चुकवितांना दुचाकी चालकाचे संतुलन बिघडून अनेक अपघात झाले होते. गावकऱ्यांचे मागणी वरून आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पिंपळगाव ते धाबेटेकडी रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. ई-निविदेची अंदाजपत्रकिय रक्कम १ कोटी ८८ लाख १६ हजार रुपये तर बांधकामाचे कंत्राट एन.एन. पुगलिया नागपूर यांना देण्यात आले होते. यावर तांत्रिक मार्गदर्शन देखरेख व सनियंत्रणाचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा चे कनिष्ठ अभियंता शैलेश हरकंडे यांचेकडे सोपविण्यात आले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये बांधकाम पूर्ण करण्यात आले. तर या रस्त्याची फेब्रुवारी २०२४ पर्यंत दुरुस्तीचे काम सदर कंत्राटदाराकडे आहे.
खरीप हंगाम २०२२ मध्ये अनेक वेळा संततधार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने रस्त्याची दुर्दशा होऊन ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे. पण कंत्राटदार एन.एन. पुगलिया यांचे दुरुस्तीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पिंपळगाव ते धाबेटेकडी रस्ता अपघातास निमंत्रण देऊन भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबद चित्रा न्युज मध्ये बातमी प्रकाशित होताच संबंधित विभाग व कंत्राटदार खडबडून जागे झाले व रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या