Ticker

6/recent/ticker-posts

त्या" गोवंश मालकाने न्यायालयात उपस्थित व्हावेलाखनी पोलिसांचे जनतेला आवाहन


लाखनी पोलिसांनी १२ गोवंश केले होते जप्त 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा :- कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची विनापरवाना वाहतूक करणारी महिंद्रा पिकअप गाडी लाखनी पोलिसांनी खुटसावरी फाट्याजवळ पकडली होती त्यात १२ गोवंशांना निर्दयतेने वागणूक देताना आढळल्याने लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ९१/२०२२ अन्वये विवेक अंबादास सेलोकर (२२) रा. कोंढा/कोसरा व सोमेश्वर महादेव पाखमोडे ( २१) रा. मुरमाडी / सावरी यांचेवर गुन्हा दाखल करून गोवंश पालनपोषणासाठी बरडकिंन्ही येथील गोशाळेत पाठविले होते पण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी लाखनी यांचे आदेशान्वये गोवंश मालकास परत करावयाचे असल्याने गोवंश मालकाने बाँड सह न्यायालय लाखनी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी केले आहे.  
        लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे हे रात्री पेट्रोलिंग वर असताना पहाटे ४ वाजताच्या सुमारास साकोली कडून भंडारा कडे जाणारी महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच ३३ जी १२१४ भरधाव वेगाने जात असल्याचे दिसल्याने तिचा पाठलाग करून खुटसावरी फाट्याजवळ अडवून गाडीची तपासणी केली असता त्यांत ०६ गायी, ०३ गोरे ०३ गोरीना विनापरवाना पिडादायक एकमेकावर भरगच्च कोम्बुन निर्दयतेची वागणूक देत कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळले. पोलिसांनी गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता तेही गाडी चालका जवळ नव्हते. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख २० हजाराचे गोवंश व महिंद्रा पिकअप किंमत ५ लाख असा ६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करून गोवंशाना बरडकिन्ही येथील गोशाळेत पालन पोषणाकरिता पाठविण्यात आले असून पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम प्राण्यास निर्दयतेने वागविण्याचा कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून विवेक सेलोकर व सोमेश्वर पाखमोडे यांना अटक करून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे यांनी आरोपितांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी लाखनी यांचे समक्ष उभे केले असता न्यायालयाने सीआरआय. एपीपी.क्रमांक ५५/२०२२ दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी आदेश पारित केला असून प्रचलित कायदा कलम ५(१) अन्वये गोवंश ज्याचे मालकीचे असतील त्यांनी दावा करण्यास बांडसह प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी लाखनी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या