आर्थिक गैरप्रकारांचा होता आरोप
दखल चित्रा न्यूज ची
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- लाखनी येथील पंचायत समिती च्या उमेद तालुका अभियान व्यवस्थापकाने बचत गटाचे सूक्ष्म गुंतवणूक आराखडा करणाऱ्या महिला असताना त्यांना काम न देता मानधन तत्वावर काम करणाऱ्या इतर कॅडरना काम देऊन आर्थिक गैर प्रकार केल्याचा सभापती प्रणाली सार्वे यांनी आरोप केल्याचे चित्रा न्यूज च्या २८ ऑक्टोबर चे अंकात " उमेद तालुका अभियान व्यवस्थापकाकडून आर्थिक गैरप्रकार " ह्या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित होताच जी. प. प्रशासन खडबडून जागे झाले पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्थानांतरण व ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता यामुळे उशिरा का होईना उमेद तालुका अभियान व्यवस्थापकाचे भंडारा येथे स्थानांतरण करण्यात आले.
लाखनी तालुक्यात उमेद अभियानाचे काम सुरू असून सदर अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा अभियान संचालक आहेत. तर लाखनी पंचायत समितीत तालुका अभियान व्यवस्थापक ह्या एक महिला असून त्या मनमर्जीने काम करीत आहेत. त्यांनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे सूक्ष्म गुंतवणूक आराखडा(एमआयपी) करणाऱ्या तालुक्यातील एमआयपी-सीआरपी महिला असताना त्यांना काम न देता अगोदरच अभियानात मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या बँक सखी, कृषी सखी, कृती संगम-सीटीटी, आयसीआरपी अशा मानधन मिळणाऱ्या महिला कॅडरच्या नावे तालुक्यातील विविध गावातील महिला बचत गटाचे सूक्ष्म गुंतवणूक आराखडा(एमआयपी) केले. असे दाखवून देयके घालण्यात आले व त्यांचे नावे बँक खात्यात जमा झालेली रक्कम त्यांचे कडून वसूल केल्याचे सभापती प्रणाली सार्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचेकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे.
सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याचे काम करणाऱ्या एमआयपी-सीआरपी महिला त्यांच्या हाताला काम न देता ज्या अगोदरच कामावर आहेत व त्यांना मानधन मिळत आहे त्यांचे नावे खोटे देयके दाखवून पैसे वसूल करून भ्रष्टाचार केला आहे. तो आकडा ५ ते १० लाख असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांचेकडून गबन केलेली रक्कम वसूल करण्यात यावी. या करिता सभापती प्रणाली सार्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांचेकडे तक्रार केली होती .चौकशीमध्ये महिलांचे बयान घेण्यात आले त्यात बँक खात्यात जमा झालेली रक्कम उमेद तालुका व्यवस्थापकाने काढून मागितल्याचे महिलांनी सांगितल्याचे चित्रा न्यूज मध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हा परिषद प्रशासन कामास लागले पण अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांचे इतरत्र स्थानांतरण झाले तसेच ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितामुळे प्रकरण थंड्याबस्थ्यात होते आचारसंहिता संपताच नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांचे स्वाक्षरीचे पत्र क्रमांक जीअव्यक/भं/एमएसआरएलएम /५७६/२०२२ दिनांक २२ डिसेंबर २०२२ अन्वये तालुका अभियान व्यवस्थापकाचे भंडारा येथे स्थानांतरण करण्यात आले.


0 टिप्पण्या