Ticker

6/recent/ticker-posts

उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि म्युनिसिपल


रायगड जिल्हा पत्रकार हेमंत सुरेश देशमुख
 
उरण-: नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि म्युनिसिपल
 एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर, सरचिटणीसपदी अनिल जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि उरण युनिटचे कार्याध्यक्ष मधूकर भोईर यांच्या मध्ये झालेल्या बैठकी मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी सफाई कामगारांना गेले दोन वर्ष पासून बोनस ठेकेदारा कडून मिळत नव्हता तसेच ESIC या सरकारी आरोग्य विम्याचे खातेही उघडलेले नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीची नियमाप्रमाणे जेवढी आवश्यक आहे ती भरावयाची रक्कम भरण्यात आलेली नाही. तसेच कायम कर्मचाऱ्यांची गेले दोन वर्ष मेडीक्लेम पाॅलीसी काढण्यात आलेली नाही. सदरहू मेडीक्लेम पाॅलीसी पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे.
असे असतानाही एक आनंदाची गोष्ट म्हणजे नवनिर्वाचित मुख्याधिकारी श्री राहूल इंगळे यांनी कायदेशीर बाजू तपासून सफाईचे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे कंत्राटी सफाई कामगारांना ठेकादारामार्फत कायदेशीर बोनस देणे बाबत आदेश दिल्याप्रमाणे मे. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या ठेकेदाराने रक्कम रू. ५३००/-- रूपये पहिल्यांदा बोनस मिळाल्या बद्दल मुख्याधिकारी श्री राहूल इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
आणि किमान वेतन, नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी आणि ESIC वीमा योजना या उर्वरित प्रश्नांची सोडवणूक करून न्याय द्यावा अशी विनंती केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या