रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
नागपूर :- येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी राजव्यापी अधिवेशना दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे सत्कार युवा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड व भाजप भटके विमुक्त युवा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आले भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे पहिले भव्य राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे संपन्न झाले. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी समारोपाला प्रमुख उपस्थिती लावली. भटके विमुक्त आघाडीचा पारंपरिक उद्योग व व्यवसाय व लोककलेला वाव देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार, तसेच विरोधी सरकारने केवळ भटक्या विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक योजनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, आता भाजपा शिंदे सरकार त्यांना न्याय देईल, सर्व विद्यापिठात भटके विमुक्त अभ्यास केंद्र, कला, संस्कृती जतन संग्रहालय, पारंपरिक व्यवसयाला रॉयल्टी, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष मा.आमदार श्री. नरेंद्र दादा पवार दरम्यान केली, तसेच सरकार म्हणून स्वतंत्र भटके विमुक्त कल्याण विभागाच्या राज्यमंत्री पदाची निर्मिती असावी अशीही मागणी यावेळी केली.
दरम्यान प्रदेश महामंत्री संजयजी केनेकर, माजी खासदार विकासजी महात्मे, इदाते आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, आमदार गोपीचंदजी पडळकर, अतुलजी पाठक, प्रदेश प्रवक्ते गणेशजी हाके, प्रदेश प्रवक्ते विनोदजी वाघ, माजी आमदार विजयराजजी शिंदे, भटके विमुक्त आघाडीचे माजी प्रदेश अध्यक्ष योगेशजी बन आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी प्रदेश सरचिटणीस गोविंदा गुंजाळकर, राजू साळुंखे, शिवाजी आव्हाड, देविदास राठोड, संतोष आव्हाड, धरमसिंग राठोड, महिला प्रदेश अध्यक्ष डॉ उज्वलाताई हाके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश सचिव युवराज मोहिते, युवती अध्यक्ष भाग्यश्री ढाकने, विदर्भ संयोजिका रश्मी जाधव, सहसंयोजक डॉ पंकज भिवटे, महिला विभाग संयोजक जयश्री राठोड, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष गणेश भाऊ मुंडे, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष सतीशजी भोसले, युवा आघाडी पुणे शहराध्यक्ष सुरज पवार,बीड जिल्ह्याचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नारायणजी मेंडके, बीड जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी संजयजी पवार, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष मंगेशजी खांडेकर व व महाराष्ट्रतील भटके विमुक्त आघाडीचे सर्व राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच महिला, युवक व युवती विभागाचे प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी होते.


0 टिप्पण्या