रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
जळगांव: - मुंबई येथून महाराष्ट्र राज्य कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची मिटिंग आयोजित केली होती . या मिटिंगसाठी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राहिलेले मा. अरुण बोंगीरवार साहेब व चंद्रकांत दळवी विभागीय आयुक्त त्याचप्रमाणे इंजिनियर व्यंकटराव गायकवाड हे सचिव पदावर मंत्रालयात सेवानिवृत्त झालेले असून यांना बहुजन कर्मचारी संघटनेकडे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विभागीय कार्याध्यक्ष प्रविणकुमार शेट्टे यांनी निमंत्रित केले होते.
परंतु संघटनेच्या ध्येय धोरणानुसार बहुजन कर्मचारी संघटनेचे राज्यनेते तथा राज्याध्यक्ष भास्करराव हिवाळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ व त्यांचे सहाय्यक अधिकारी मा. श्री. प्रविणकुमार शेट्टे यांनी वरील महोदयाबद्दल बहुजन कर्मचारी संघटनेकडे राज्यस्तरीय पदाची मागणी केली होती व आहे . परंतु राज्याचे सचिव म्हणून मा. वीरूदेव व्हडकर व राज्याचे अतिरिक्त सचिव म्हणून संजय एरंडे पुणे हे असून त्याप्रमाणे राज्याचे उपाध्यक्ष आय. टी. आय. विभागाचे शिवाजीराव जाधव हे असून याबाबत मा. बोंगीरवार साहेबांना सखोल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे मा. स्वर्गवासी र . ग. कर्णी साहेब यांच्या मध्यवर्ती संघटनेकडे त्यांना विनंती करण्यात आली आहे ,परंतु त्यांनी मात्र बहुजन कर्मचारी संघटनेकडे आग्रह धरला आहे . याबाबत अधिक चर्चा केली असता मा. भास्करराव हिवाळे यांनी मा. बोंगीरवार साहेब , चंद्रकांत दळवी साहेब , व्यंकटराव गायकवाड साहेब या महोदयांना बहुजन कर्मचारी संघटनेचे वरिष्ठ सल्लागार पदी देता येऊ शकते असे मात्र भास्करराव हिवाळे यांनी आवर्जून सांगितले . या व्यतिरिक्त इतर कोणतेही पद देता येणार नाही.
याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहाय्यक अधिकारी मा. प्रविणकुमार शेट्टे साहेब यांच्याबाबत आलेल्या विचाराची दिशा व सर्वांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असे संघटनेचे बृहन्मुंबई महानगर पालिकेचे सध्या विराजमान सहाय्यक आयुक्त राजू तडवी यांनी त्यांना मार्गदर्शन करून शांत केले असे संघटनेचे शिवाजीराव जाधव अहमदनगर यांनी कळविले आहे . याबाबत सर्व माहिती बहुजन कर्मचारी संघटनेचे मुखपत्र असलेले वृतपत्र साप्ताहिक बहुजन सेवक चे उपसंपादक अशोक जाधव कळवितात .


0 टिप्पण्या