दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
कोल्हापूर :- गजापूर येथील गेळवडे जलाशयात अंघोळ करताना , विजय शंकर पट्टीमनी ( वय २४ , रा . चिक्कोडी , जि . बेळगाव ) पाण्यात बुडून ठार झाला . सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली . स्थानिक तरुणांनी मदत करून तासाभरात त्याचा मृतदेह जलाशयाबाहेर काढला . विजय दहा मित्रांसमवेत चारचाकीतून पहाटे गावातून विशाळगडला नवस फेडण्यास निघाला होता . विशाळगडच्या अलीकडे चार किलोमीटरवर असलेल्या गेळवडे धरणाच्या जलाशयात अंघोळ करण्यासाठी ते पाण्यात उतरले . विजय पोहताना गटांगळ्या घेत पाण्यात बुडाला . सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे


0 टिप्पण्या