Ticker

6/recent/ticker-posts

अवैध वाळूचे टिप्पर पंधरा दिवसात दुसऱ्यांदा जप्त

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

बुलढाणा :- खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करताना ( ता . ४ ) टिप्पर महसूल विभागाने व्यक्त केला . महसूल विभागाच्या अवैध वाळू प्रतिबंधक पथकाने ४ डिसेंबर रोजी अंढेरा ते सरंबा फाट्या दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारे सय्यद राजिक सय्यद सादिक राहणार चिखली यांच्या मालकीचे टिप्पर क्रमांक एम एच २४ ए . बी ६७७४ जप्त केले . सदर टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात अटकाव करून ठेवण्यात आला . विशेष म्हणजे पंधरा दिवसात सदर टिप्पर अवैध वाळू वाहतूक करताना दुसऱ्यांदा पकडण्यात आले . यापूर्वी २१ नोव्हेंबर रोजी देऊळगाव मही नजीक सदर टिप्पर अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले होते . या संदर्भात महसूल विभागाने केलेला दंड भरून टिप्पर सोडविण्यात आले होते . सदर कारवाई पथक प्रमुख तहसीलदार श्याम धनमणे , नायब तहसीलदार विकास राणे , तलाठी श्री बरांडे , यांच्या पथकाने केली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या