Ticker

6/recent/ticker-posts

गुटखा विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या एकास अटक

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

नाशिक :-मालेगाव शहरातील किल्ला पो . ठाण्याच्या हद्दीतील खयाबान निशात चौकातील सुफीयान पान टपरीत लईक अहमद रईस अहमद ( ३२ ) रा . गालीबनगर आणि दुकान मालक सुफीयान अहमद निहाल अहमद रा . मालेगाव यांनी महाराष्ट्र राज्यात सुगंधीत पान मसाला , तंबाखू गुटखा पदार्थ विक्री करण्यास मनाई ( प्रतिबंध ) असतांना एकूण ४६ हजार ७४० रुपयाचा गुटखा साठा कबजात बाळगुन विक्रीकरीत असताना मिळून आल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी लईक अहमद रईस अहमद ( ३२ ) याला अटक केली . सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुमारास ही कारवाई करण्यात आली . या घटनेची फिर्याद पो . कॉ . भुषण खैरनार ( ३२ ) किल्ला पो . ठाणे यांनी दाखल केली असून पुढील तपास पो . उपनिरीक्षक ढाकणे करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या