दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
उस्मानाबाद:- येथे व्यंकटेश महाजन महाविद्यालयात पार पडलेल्या जिल्हा स्तरीय वेट लिफ्टींग ( वजन उचलने ) स्पर्धेत शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम येथिल विद्यार्थी आकलेस आसिफ जमादार वय 16 वर्ष हा 61 किलो वजन गटात उस्मानाबाद जिल्हयात दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाला . आकलेस जमादार हा भूम येथील मौलाली तालिम संघाचा खेळाडु असुन त्याने हे प्रशिक्षण प्रा . बी . के . जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले आहे . आकलेस याच्या यशाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे . त्याच्या या यशा बद्दल शंकरराव पाटील कॉलेजच्या वतीने प्राचार्य संतोष शिंदे व सर्व कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे . या नेत्रदीपक यशामुळे भूमचा नावलौकिक पणा वाढला आहे .


0 टिप्पण्या