गौतम सोनवणे. जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,
औरंगाबाद :- या बाबतीत माहिती अशी की तक्रारदार यांच्या विरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता
या गुन्ह्यात मदत मिळवण्यासाठी गावचे पोलीस पाटील यांनी मध्यस्थी करून बिडकीन पोलीस स्टेशन चे पोलीस जमादार श्री विजय पवार यांनी दिनांक १०/१२/२०२२ व १२/१२/२०२२ रोजी ८० हजाराची मागणी केली
तडजोडीत ५० हजार रुपये व जेवणासाठी म्हणून फोन पे वर २ हजार रु पैकी १५०० रु देण्याचे ठरले या तडजोड ची मध्यस्ती गावचे पोलीस पाटील यांनी मध्यस्ती केली
परंतु तक्रारदार याना पैसे देण्याचे इच्छा नसल्याने त्यांनी तात्काळ औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधून वरील माहिती दिली
या फिर्यादी वरून लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले
व दोन्ही विरोधात कलम भा.द .वी.३५४ प्रमाणे.ही कारवाई ( दि .२६/१२/२०२२ रोजी ) सोमवारी दुपारच्या सुमारास बिडकीन येथे करण्यात आली.
विजय पवार ( वय ३६ वर्ष) व डोंगरु नाईक तांडा चे पोलीस पाटील असे अटक करण्यात आलेल्यांची नांवे आहेत.तक्रार दार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सरळ औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर त्या दोघांना पकडण्यासाठी आज दुपार पासून बिडकीन येथे सापळा रचला होता.दुपारच्या सुमारास पोलीस जमादार व पोलीस पाटील या दोघांनी तडजोडीअंती ₹ ५९/- हजार रुपये स्विकारुन घेतल्याप्रकरणी त्यांना अटक केली.हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे,पोलीस निरीक्षक श्री नंदकिशोर क्षीरसागर, , पो ना राजेंद्र जोशी, भूषण देसाई, यांनी केली.या कारवाई मुळे पैठण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे
.या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 टिप्पण्या