पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेत पांच आमदार पाठवले जातात.हेतू हाच कि उच्चशिक्षित लोकांचा उच्चशिक्षित आमदार.जेथे घराणेशाही खपणार नाही.म्हणजे सातबारा व भोगवटा प्रमाणपत्र वरील वारस. जेथे मतांसाठी लांडी लबाडी मारावी लागणार नाही.जेथे मुर्ख मतदारांना पैसे वाटावे लागणार नाही.जो विधानसभा, लोकसभा, मंत्रीमंडळ,शासन , प्रशासन बाबतीत पर्याप्त जाणकार असेल, अभ्यासू असेल.जो कोणत्याही लुटारूंची टोळीचा म्हणजे राजकीय पक्षांचा सदस्य असणार नाही.असा बुद्धीमान, विद्वान, प्रामाणिक माणूस विधानपरिषदेत पोहचला तर धनदांडगे,अडाचणोट आमदारांना वरचढ ठरेल.म्हणून विधानपरिषदेला वरिष्ठ सभागृह म्हणतात.पण प्रत्यक्षात तसे वास्तव नाही.आहे ते उलटेच.कसे?
डॉ सुधीर तांबे दोन वेळा म्हणजे चक्क एक तप, बारा वर्षे विधानपरिषदेत आमदार होते.काय केले त्यांनी? काहीच नाही.त्यांचे नांव फक्त निवडणूक वेळी ऐकायला येते. देऊन घेऊन पेपरमधे फोटो छापून येतो.आपल्याकडे पाहून हसतांना दिसतात ते.यांचे आहे कि आणखी कोणाचे,पण मतदारांना घरपोहच पाकिट येते.यात चार माणसांचे मटण चे कुपन येते.मग,हा उच्चशिक्षित मतदार जो स्नातक असतो,तो मतदान करतो.तांबे किंवा सोनवणे निवडून येतात.बारा वर्षं विधानपरिषदेत खुर्चीवर बसतात.इतकेच.
आता हे भाऊ थकले.म्हणे आता यांचाच पोरगा. म्हणजे नगर जिल्ह्यात किंवा इतर पांच जिल्ह्यात कांग्रेस,भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना मधे एकही माणूस लायक नाही कि जो महाराष्ट्र विधानपरिषदेचा सदस्य होऊ शकतो.अशी पवार, पटोले, ठाकरे , फडणवीस यांची खात्री झालेली आहे.म्हणून तांबेंचा पोरगा तांबेच.पोरगा नसता तर पोरगी.इतकाच काय तो फरक.ही आहे राजकीय म्होरक्यांची लोकशाही.आणि बनणार विधानपरिषद.तरीही आपण तिला वरिष्ठ, जेष्ठ सभागृह म्हणायचे.म्हणा!ज्याला राजकीय अक्कल नसेल तो म्हणेल.या आधीही याच पवार,पटोले,ठाकरेंनी कनव्हिक्टेड क्रिमीनल माणसांना विधानपरिषदेत घुसळण्याचा प्रयत्न केला होता.यांच्या नाकाची लांबी ,उंची मोजली पाहिजे.भाजपने तर चक्क पन्नास आमदार गाई म्हशींसारखे रातोरात पळवून आसामच्या अरण्यात लपवून ठेवले होते.विराटांच्या गाई कौरवांनी पळवल्या होत्या.यांनी माणसे पळवली.म्हणून हे कौरवांपेक्षा सरस. त्यांच्याही नाकाचे मोजमाप केले पाहिजे.
म्हणे विधानपरिषदेत कोणीही लांडी लबाडी करून कोणी निवडून येऊ नये.येथे तर सत्यजित तांबेनी तर सुरूवात तशीच केली आहे.कांग्रेसने बापाला तिकीट दिले.आणि कमालच झाली.आणि पोऱ्या ने उमेदवारी भरली.मुलगी बापाने पाहिली आणि हळद पोऱ्याला लावली.इतकी बदमाषी? अरे,सांगांना कि, माझ्या पोऱ्या आता वयात आला आहे,त्याला उमेदवारी द्या.पण तितकीही नैतिकता बाप आणि पोऱ्या मधे नाही.थोरात मामा मधे तर मुळीच नाही.त्यांनी तरी पटोलेंना सांगायला हवे होते कि,आमचे तळघरात नॉनव्हेज शिजत आहे. आणि हे तांब्याचे वारस विधानपरिषदेत ठेवले जाणार आहे.सहा वर्षे.फोटो काढून थोरात मामाला दाखवणार आहे.बघ मामा,कशी टोपी घातली कांग्रेस ला?अशी ही साला मेव्हण्याची गणगवळण आणि भाचाची लावणी.या वगनाट्याच्या स्पर्धेत दादा कोंडके,भिमा भिका,काळू बाळू फिका वाटतो.तरीही आमच्या पांच जिल्ह्यातील उच्चशिक्षित स्नातक आणि शाळा मास्तर यांना मतदार करुन कोणता आदर्श घडवणार आहेत?
घटना लिहीणाऱ्यांना अपेक्षा होती कि येथे धनदांडगे अडाचणोट पैसे वाटून निवडून येणार नाहीत.पण या निवडणुकीत तर मतांचा रेट मोठा आहे.जळगाव महानगरपालिका पेक्षा.मी डोळ्यांनी पाहिले आहे,दोन माणसे येतात,पाकिट घेऊन यादीनुसार घरोघरी जाऊन मताचे प्रलोभन देतात.ज्याला हे माहीत नसेल ,त्यांनी बावळट माणसाने हा लेख वाचू नये.बापाने लग्न करून दिले तर हानिमून कसा करावा?हे बापाला विचारू नये.
दुसरे उमेदवार आहेत शुभांगी पाटील.यांचेविषयी काही कुठे वाचण्यात आले नाही.पाहाण्यात आले नाही.आता टिव्हीवर पाहिले.पण धुळ्याचे ईश्वर पाटील नावाचा माणूस मात्र चांगलाच प्रसिद्ध आहे.माणूस शेतकरी आहे.पण माजोरी मंत्री आणि आमदारांना घाम फोडतात.कोणत्याही विषयावर फाडफाड बोलतात.जर असा माणूस विधानपरिषदेत पोहचला तर किमान मंत्र्यांना लाज वाटून तोंड लपवतील.हे आहेत रस्त्यावरचे, गल्लीबोळातील कार्यकर्ते.पाठीशी कोणी नसतांना अपना हाथ जगन्नाथ.हाती पैसा नसतांना निवडणूक लढण्याची जिद्द.यांचा समज आहे कि, विधानपरिषद ही स्नातक, उच्चशिक्षित,शिक्षक लोकांचे सभागृह आहे.धनदांडगे तर विधानसभेत ही निवडून येतात.मतदारांना लिलावातून खरेदी करू शकतात.पण मी फुकटात निवडून येण्याची अपेक्षा ठेवतो.कमाल आहे!या चांदणी चौकात फुकटात निवडणूक ? कसे शक्य आहे?पण यांना विश्वास आहे कि महाराष्ट्रातील राजकारण नासलेले ,बिघडलेले असले तरी स्नातक मतदार तितका बिघडलेला नाही.म्हणून करू प्रयत्न.केला प्रयत्न.घटना लिहीणाऱ्यांनी तसे लिहून ठेवले आहे कि, कोणताही स्नातक व सुबुद्ध व्यक्ती महाराष्ट्र विधानपरिषदेचा सदस्य निवडून येऊ शकतो.बस्स!इतकाच काय तो भाबडा विश्वास ! आणि असाच विश्वास बाळगाणाऱ्या स्नातक मतदारांवर आहे.जे स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी जनगणमन गातात,अर्थ समजतात, इतरांना समजावून देतात.ते ईश्वर पाटील यांचे मतदार आहेत.म्हणून जर लोकशाही पवित्र ठेवायची असेल तर म्हणे,सुरूवात माझ्यापासून करतो.मी मतांबद्दल चहा पाहणार नाही.मताचे पैसे देणार नाही.जर तसे केले आणि करावे लागले तर विधानपरिषद सदस्य होण्याची माझी लायकी नाही.मीच नालायक बनलो तर,तुमचे कसे नेतृत्व करणार?मीच बदमाष असलो तर तुमच्या वाट्याचे मीच खाऊन जाणार.
ईश्वर पाटील यांची पात्रता हिच कि,मी उच्चशिक्षित आहे.मी अभ्यासू आहे.मी प्रामाणिक आहे.मी बरे वाईट धंदे करीत नाही.मी लांडी लबाडी करीत नाही.मी माणसांची,मतांची खरेदी विक्री करीत नाही.आणि असाच टिकुन राहिलो,तर मीच खरा या लोकांचा प्रतिनिधी आणि या लोकशाहीचा वारस.बघा एकदा अजमावून!
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या