Ticker

6/recent/ticker-posts

जनावरांचा गोठा जळून ५० हजाराचे नुकसान

लाखणी तालुक्यातील मुरमाडी/तूप येथील घटना

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा:- पाळीव जनावरे बांधण्याचा गोठा शॉर्टसर्किटमुळे जळाल्याची घटना सोमवार(ता.२३) पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वेळेत आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. त्यात सुधाकर कठाने आणि प्रमिला कठाने यांचे ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज तलाठी एम.एन. मरसकोल्हे यांनी पंचनाम्यात वर्तविला आहे. 
          शेती परवडेनासी झाली नसल्यामुळे शेतीस जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळला. गाय, बैल, म्हैस, रेडा, शेळ्या या सारखे पाळीव प्राणी पाळणे सुरू केले. त्यांचे वास्तव्य व वैरणाची सोय व्हावी. या करिता गोठ्याची व्यवस्था करण्यात आली. सुधाकर कठाने व प्रमिला कठाने ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे वडिलोपार्जित जनावरांचे गोठे आहेत. या गोठ्यांना सोमवारी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याचे समजताच संबंधितांनी आरडाओरड केली. त्यांचे गोठे घरालगत असून घर भरवस्तीत असल्यामुळे इतरांचे नुकसान होऊ नये. म्हणून आजूबाजूचे गावकरी जागे झाले व लगतच्या मोटार पंपावरून पाणी घेऊन आग विझविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची सूचना मुरमाडी/तूप चे तलाठी एम.एन. मरसकोल्हे यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळावर जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. त्यात ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवून पुढील कार्यवाहीसाठी लाखनी तहसीलदार महेश शितोळे यांचेकडे पाठविण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या