Ticker

6/recent/ticker-posts

माजी खासदार डॉ गोपाळरावजी पाटील यांची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


लातूर :- दिनांक 22 जानेवारी राजश्री शाहू महाविद्यालयाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते, शिक्षण महर्षी तथा माजी खासदार मा.डॉ.श्री.गोपाळरावजी पाटील साहेब यांची लातूर येथील निवासस्थानी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.श्री.किरण पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शिक्षकांशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.

याप्रसंगी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.सुधाकर श्रृंगारे, आमदार श्री.संभाजी पाटील निलंगेकर, आमदार श्री.रमेशअप्पा कराड, श्री.प्रवीण घुगे, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथ मगे, श्रीमती प्रेरणाताई होणराव, श्री.शैलेश गोजमगुंडे, लातूर शहर निवडणूक संयोजक श्री.किशन बडगिरे, शहर चिटणीस ॲड.श्री.दिग्विजय काथवटे आदींची उपस्थिती होती.
उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या