Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा नेत्या अर्चना ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अणदूर येथे मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

 मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


उस्मानाबाद :- धाराशिव :- दिनांक 22 जानेवारी तुळजापूर तालुक्यातील मौजे अणदूर येथे भाजपा नेत्या अर्चना ताई पाटील यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकवाचा या कार्यक्रमास महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ओपन जिम व वॉकिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

तसेच विविध विकास योजनांबाबत चर्चा केली. अनेक योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. अगोदर महिलांना उघड्यावर शौचालयास जावे लागत होते. मात्र पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी 'इज्जत घर' या योजनेची सक्ती करून परिवर्तन घडविले.

महिलांच्या उन्नतीसाठी मा.मोदी साहेबांनी नेहमीच उपयुक्त निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळेच देश-विदेशात त्यांना सन्मान मिळतो आहे.  

या कार्यक्रमात परिसरातील नंदगाव, खुदावादी, चिवरी आदी गावातील नवनियुक्त महिला सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अधिकाधिक संख्येने महिलांनी राजकारणात यावे असे आवाहन यावेळी केले. बचत गटातील महिलांशी देखील चर्चा केली. 

बचत गटातील महिलांनी नवीन उद्योग व्यवसाय उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यासाठी त्यांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तयार आहोत. यावेळी उपस्थित महिलांना वाण भेट देण्यात आले.

शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरुजी यांच्या जीवन चरित्रावर आधारित उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल डॉ.अनिताताई मूदकण्णा यांचा सत्कार करण्यात आला.  

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे, भाजप महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, भाजपा महिला मोर्चा प्र.का.सदस्य मनीषाताई केंद्रे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, गावातील प्रमुख महिला कार्यकर्त्या सौ.माधुरीताई दीपक आलुरे, सौ.मीराताई साहेबराव घुगे, सौ.अनुराधा बालाजी पापडे, सौ.अनुजा प्रशांत कुलकर्णी, सौ.विद्याताई दयानंद मुडके, ॲड.दीपक आलुरे, श्री.साहेबराव घुगे, श्री.बालाजी तापडे, श्री.प्रशांत कुलकर्णी, श्री.दयानंद मुडके, श्री.अनिल कुलकर्णी, श्री.इमाम शेख, श्री.निलेश आलुरे, श्री.शिवकुमार स्वामी, बचत गटातील महिला सदस्य, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व महिलांची उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या