कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- लाखनी येथील संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी खेळाडू नवनिर्वाचित सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
संत तुकाराम सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सेवकभाऊ वाघाये पाटील उद्घाटक माजी राज्य शिक्षण मंत्री नानाभाऊ पंचबुधे ,महानंदाचे संचालक विनायकराव बुरडे ,माजी सभापती अशोक भाऊ चोले लाखनी नगरपंचायत चे उपाध्यक्ष प्रदीप तितिरमारे ,सभापती प्रणालीताई सारवे ,जीप सदस्य मनीषाताई निंबार्ते ,महिला बालकल्यान सभापती स्वाती वाघाये, सरोज वाघाये ,पंचायत समिती सदस्य सुनील बांते,प.स मनीषाताई हलमारे ,योगिताताई झलके, शारदाताई मते ,सविताताई राघोर्ते नगरसेविका विभाताई हजारे विचार पिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा माल्यारपन करून झाली .या कार्यक्रमात कुणबी समाजातील दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये 85% पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पदवी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . राज्य ,राष्ट्रीय स्तरावर क्रीडा व स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. नवनिर्वाचित सरपंच ,पंचायत समिती सदस्य जीप सदस्य तसेच समाजातील जेष्ठ समाज बांधवांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला .या सत्कार सोहळ्यात बोलताना माजी आमदार वाघाये म्हणाले की बिहारप्रमाणे महाराष्ट्रातील ओबीसींची जनगणना झाली पाहिजे यासाठी समाजाने संघर्ष करावा असे समाज बांधवांना आवाहन केले तर उद्घाटक नानाभाऊ पंचबुधे म्हणाले व्यक्ती हितापेक्षा समाज बांधवांनी समाज हीत जोपासावे व समाजाला मोठा करावे . पंचायत समिती सभापती प्रणालीताई सारवे म्हणाल्या की मी आज या ठिकाणी जे उभे आहे त्याला सावित्रीबाई फुले ह्या कारणीभूत आहेत तर मनीषा ताई निंबारते म्हणाल्या महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श ठेवून समाज उन्नतीसाठी कार्य करावे तर महिला व बालकल्याण सभापती वाघाये म्हणाल्या समाजातील व्यक्ती राजकीय क्षेत्रात सर्वोच्च पदावर असल्या पाहिजेत यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न केले पाहिजेत तर महानंदाचे संचालक विनायकराव बुरडे म्हणाले की समाजित हा महत्त्वाचा आहे समाज हितातच राष्ट्रहित दडलेला आहे आणि म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे .
याप्रसंगी श्री अशोक चोले , अवंती सिंगनजुडे यांनीही विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाची संचालन उमराव आठोडे व दुर्गाताई अतकरी प्रस्ताविक जयकृष्ण फेंडरकर आभार प्राध्यापक उमेश सिंगनजुडे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी रामदासजी सार्वे ,माधवरावजी भोयर ,रमेश रोटके, भोजराज डहाके ,परसरामजी फेडरकर रमेश झलके, संजय वनवे मोहन बोंद्रे ,देवराम फटे, अतिश झलके,राजेश बांडेबुचे,मुकेश मते,नाना राघोर्ते, अर्चना ढेंगे अंजना पिपरशेंडे ,शालू उरकुडे स्मिता सिंगनजुडे ,सारिका भोयर सारिका रेहपाडे,शैला सार्वे, अंजली कानतोडे ,सीमा नागलवाडे यांनी विशेष सहकार्य केले.


0 टिप्पण्या