कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- मुरमाडी/सावरी महाप्रज्ञा बुद्ध विहारात भारत जोडो, समाज जोडो या संकल्पनेवर आधारित निःशुल्क अभ्यास संस्कृती चळवळीद्वारा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे २८ जानेवारी २०२३ रोज शनिवार ला सकाळी १०:३० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटक पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, आयआरएस नागपूर चे धीरज पाटील, अध्यक्ष स्थानी समाजकल्याण नागपूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक नागपूर चे आदिवासी विकास सहाय्यक आयुक्त नयन कांबळे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता अनिल बहादुरे, महाप्रज्ञा बुध्द विहाराचे अध्यक्ष सुरेंद्र बनसोड, प्रमुख पाहुणे आरजेपीए अभ्यास यात्रेतील को-ऑर्डीनेटर, नागपूर चे सामाजिक कार्यकर्ता शिरीष मामा फुलझेले, भंडारा पंचायत समिती चे कृषी अधिकारी अजय गजभिये, शहापूर चे वरिष्ठ संयोजक संजय बांगर, नागपूर चे उद्योजक जगदीश डवरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे सचिव डॉ. रेवाराम खोब्रागडे, उपाध्यक्ष रामप्रसाद देशपांडे, सहसचिव आशिष गणवीर आणि सदस्यांनी केले आहे.


0 टिप्पण्या