Ticker

6/recent/ticker-posts

पूर्व पतीच्या चाकू हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी जखमी

पिंपळगाव/सडक शंकरपटातील घटना

पूर्व पतीवर गुन्हा दाखल


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- न्यायालयात सुरू असलेल्या सोडचिठ्ठी चे कारणावरून पूर्व पतीने पत्नीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवार(ता.२६) दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान पिंपळगाव/सडक शंकरपटात घडली. लाखनी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी पत्नीचे नाव पूजा गणेश वैद्य(२६) रा. मुंडीपार/सडक तर आरोपी पतीचे नाव सुभाष जनार्धन हुमने(३५) रा. पूरकाबोडी, ता. भंडारा असे आहे. पत्नीवर उपचार सुरू असून पोलिसांनी पतीस ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
             कुमारी पूजा व सुभाष जनर्धान हुमने यांचे २०१७ मध्ये सामाजिक रीतिरिवाजानुसार विवाह पार पडला. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेले. नंतर त्याने पत्नी चे चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारपीट करीत असे. त्रासाला कंटाळून ती माहेरी आली होती. पतीच्या स्वभावात काही सुधारणा होईल. या करिता तिने काही दिवस वाट पाहीली. पण सुधारणा होण्याचे काही चिन्ह दिसत नसल्यामुळे त्याचे विरोधात २०२२ मध्ये सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथील न्यायालयात सोडचिठ्ठी करिता प्रकरण न्यायप्रविष्ठ करून गणेश संजय वैद्य रा. मुंडीपार/सडक यांचेशी १६ जानेवारी २०२२ मध्ये दुसरा विवाह केला. गुरुवारी ४:३० वाजता घराशेजारील महिला व चुलतसासू यांचे सोबत पिंपळगाव/सडक चे शंकरपटावर आली होती. व थेटरी-मनेरी चे दुकानात झुमके खरेदी करून दुकानदाराकडून उर्वरित पैसे परत घेत असताना पूर्व पती सुभाष जनार्धन हुमने याने न्यायालयात सुरू असलेल्या सोडचिठ्ठी चे कारणावरून चाकुने पत्नीचे उजव्या हाताचे मंनगटाचे पंज्यावर, दंडावर तसेच डाव्या बाजूला छातीवर व उजव्या हाताच्या दंडावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. आजूबाजूला असलेल्या लोकांनी जखमीस पूर्व पतीचे तावडीतून सोडवून चांगला चोप दिला. तसेच लाखनी पोलिसांना घटनेची सूचना दिली. पोलिस घटनास्थळी पोहचून जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भर्ती केले. तथा पूर्व पतीवर अपराध क्रमांक २०/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला. कलम ३२६ भादवि अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात महिला पोलिस हवालदार सरिता कोटांगले पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या