मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
औरंगाबाद :- दिनांक 24 जानेवारी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक २५/०१/२०२३ रोजी उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शिक्षक मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
या निवडणुकीचा प्रभारी भूमिकेतून आमदार राणा जगजितसिंह पाटील व लातूर शिक्षण मंडळाचे माजी संचालक श्री.सुधाकर आबदारे यांना कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती आमदार पाटील यांनी केली आहेत.
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत असून याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रा.किरण पाटील यांच्या माध्यमातूनच जुन्या पेन्शन योजनेचा हा विषय मार्गी लागण्यास मदत होऊ शकते.
शिक्षकांच्या सार्थ मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याची क्षमता याच सरकार मध्ये असून केंद्र शासनाच्या सहकार्याने अनेक विषय मार्गी लागण्यासाठी शिक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत. विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांसाठी नुकतेच महायुती सरकारने १,१६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
मराठवाड्यातील जवळपास ६५,००० शिक्षक मतदारांना या मेळाव्याचे ई-निमंत्रण देण्यात येणार असून या सर्वांना ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब ऑनलाइन संबोधित करणार आहेत.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या