Ticker

6/recent/ticker-posts

सीआरझेडच्या परवानगीचे अधिकार राज्यसरकारकडे असल्याने चैत्यभूमी जवळच्या रस्त्याचे रुंदीकरण होईल - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले



रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

 मुंबई - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमी आणि चैत्यभूमी ते इंदूमिल पर्यंतचा रस्ता समुद्रात भराव टाकून रुंद करण्याबाबत सी आर झेडची परवानगीचे राज्य शासनाला अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने जिल्हाअधिकाऱ्यांकडे पाठविण्यात यावा असे निर्देश आज झालेल्या शासकीय बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले दिले. बांद्रा येथील जिल्हा अधिकारी कार्यलयात चैत्यभूमीच्या रस्त्याच्या रुंदी करणाबाबत मुंबई मनपा;जिल्हा अधिकारी;सामाजिक न्याय आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिकारी निधी चौधरी;उपजिल्हाधिकारी विकास नाईक; आदी अधिकारी उपस्थित होते.

बांद्रा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याबाबतच्या सर्व परवानग्या बाबत चे काम पूर्ण झाले असून लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांद्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात लवकर उभारला जाईल अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; महापरिनिर्वाण समन्वय समिती चे सरचिटणीस नागसेन कांबळे; सुमित वजाळे; अमित तांबे; आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या