Ticker

6/recent/ticker-posts

राजेंद्र झाडे यांना ओबीसी क्रांती मोर्चा चे समर्थन

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

भंडारा :- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारी 2023 ला संपन्न होत आहे .शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार राजेंद्र बाबुराव झाडे यांना ओबीसी क्रांती मोर्चाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
 या निवडणुकीमध्ये ओबीसी चळवळीचे नेते आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भरती संघटनेचे उमेदवार श्री राजेंद्र बाबुराव झाडे हे मैदानात आहेत आमदार कपिल पाटील आमदार कपिल पाटील ओबीसींच्या प्रश्नांसाठी भांडत आहेत .शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार या मातीत पेरत आहेत .बहुजनांचा प्रतिनिधी शिक्षक मतदार संघातून निवडून जावा यासाठी ओबीसी क्रांती मोर्चा चे अध्यक्ष संजय मते यांनी शिक्षक भारती या संघटनेला समर्थन दिला आहे .भंडारा जिल्ह्यातील ओबीसी समाज ओबीसींच्या हितासाठी आणि ओबीसींच्या उन्नतीसाठी श्री राजेंद्र बाबुराव झाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास आहे ओबीसी बांधवांनी ओबीसी शिक्षक बंधू-भगिनींनी श्री राजेंद्र बाबुराव झाडे यांच्या पाठीशी उभे राहून शिक्षक मतदार संघात ओबीसी बहुजनांचा प्रतिनिधी विधिमंडळात जावा यासाठी ओबीसी क्रांती मोर्चा नेआपले समर्थन पत्र श्री राजेंद्र झाडे यांना दिले आहे यावेळी ओबीसी जनगणना परिषदेचे जिल्हा समन्वयक तथा शिक्षक भरतीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे,शिक्षक भारती जिल्हा कार्यवाह विनोद किंदरले ,शिक्षक संघटनेचे युवराज वंजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या