Ticker

6/recent/ticker-posts

बाल संस्कार शिबिर,भिमनगर उस्मानाबाद येथे दहा दिवसीय शिबीराची सुरुवात

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


उस्मानाबाद :- दिनांक 23 जानेवारी उस्मानाबाद दि.बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया,शाखा उस्मानाबादच्या वतीने स्मृती बुध्दविहार भिमनगर उस्मानाबाद येथे आज दि.23/01/2023 रोजी,09.15 सकाळी वाजता,दहा दिवसीय बाल संस्कार शिबिराची सुरूवात करण्यात आली.यावेळी सकाळी सामुहिक वंदना घेवुन शिबिराची सुरूवात करण्यात आली.तसेच आजच्या शिबिरा मध्ये महिला आघाडीच्या अध्यक्ष,शिलाताई चंदनशिवे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.तर मा.कांबळे बी.एन यांनी विद्यार्थ्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रश्नोत्तरी घेतली.त्याच बरोबर दि.बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया शहराध्यक्ष तथा लेखक/संपादक विजय अशोक बनसोडे यांनी विद्यार्थ्यां समवेत मनमोकळा संवाद साधत विद्यार्थ्यांना "संस्कार" म्हणजे काय ? संस्काराचे प्रकार यावर खुली चर्चा करून प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनोगत घेत,त्यांना आपल्या मनाला सुसंस्कारीत करण्यासाठी "संस्कार" किती महत्वाचे आहेत,हे पटवुन सांगितले.यावेळी सकाळच्या सञात उपासिका,केंद्रिय शिक्षिका मिनाताई लगाडे ताई,बौध्दाचार्य कुमार ढेपे,उपासिका केंद्रिय शिक्षिका विजयमाला धावारा,ता.सरचिटनीस निखिल बनसोडे यांची उपस्थिती.या बाल शिबिरास बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सुञसंचलन ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या