जळगाव महापालिका आज पाकिस्तानातील लाहोर सारखे झाले आहे.कौरवांचे हस्तिनापूर झाले आहे.कोणीही येतो.चोरी करून जातो.कोणी घरकूल चे कर्ज चोरून घेतो.कोणी पंखे ,कुलर , कम्प्युटर चोरतो.सिपाई ,कम्पांउंडर माणसे भरती होऊन दोनच दिवसात इंजिनिअर , डॉक्टर बनतात.दोन आयुक्त एकाच खुर्चीवर बसतात.एक म्हणे मी पालकमंत्री चा.दुसरा म्हणे मी नगरविकास मंत्री चा.हे काय गौडबंगाल आहे? पालकमंत्री व नगरविकास मंत्रीला इतकी तर अक्कल पाहिजे कि दोन दोन आयुक्त का नेमावेत ? बेवडे बावडे लोक सरकार चालवतात कि काय?सात नंतर हुकुम करतात कि काय? आणि आम्ही जळगाव चे लोकांनी, डॉक्टर इंजिनिअर प्रोफेसर वकील व्यापारी यांनी गंमत पाहायची काय? एक उपायुक्त फातले लांच घेतांना पकडला गेला.दुसरा उपायुक्त गायकवाड उपायुक्त ची खुर्ची बळकावून बसला.तिसरा आयुक्त पवार त्याच खुर्चीवर तण्णावून बसला.खुर्चीसाठी दोन आयुक्त कोर्टात गेले.म्हणे मला पाहिजे कमवती खुर्ची.तरीही गुलाबराव, शिंदे, फडणवीस गंमत पाहात आहेत.अरे हे सरकार आहे कि तमाशा मंडळ? कोणीही कोणाचा पेंद्या व्हायचे?
जळगावच्या नागरिकांनो, शिंदे, गुलाबराव, फडणवीस यांची सरकार चालवण्याची तऱ्हा तरी पहा.या गोलमाल पार्ट _३ मधून जळगाव ची सुटका करायची आहे.ती जबाबदारी आपली आहे.आपली म्हणजे ,तुमची आमची नागरिकांची.
म्हणून जागृत व्हा.जागृत करा.बदल करा.
..शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या