रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
नागपूर :-अनेक दिवसापासुन चर्चा सुरू असलेल्या आणि राजगृह आणि आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या समाजातील निष्ठावान कार्यकर्ता च्या मनात असलेल्या राजकीय युतीला अखेर हिरवी झेंडी मिळाली
यामुळे स्वाभिमानाने राजकीय सत्तेकडे जाण्याची वाटचाल सुरु झाली ही आशा निर्माण झालेली असल्याचे समाजाला वाटु लागले आहे
परंतु एकीकृत चे ढोंग रचणारे , पोटभरू , समाज हीताचे सोडुन फक्त स्वताचीच राजकीय पोळी शेकणारे आठवलेजी ,कवाडेजी ,मानेजी यांचे काही कार्यकर्ते ओरडु लागले आहेत की वंचित,शिवसेना युती दुबळी असुन समाजविघातक ठरविण्यासाठी बालीश वक्तव्य करीत मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी एकपक्ष एकसंघ होऊं पाहणा-या समाजाचे समाजमन कलुषीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत
परंतु मा.आठवले जी , मा.कवाडे जी , मा.माने जी , यांनी स्वाभिमान गहान ठेवुन लाचारी स्विकारीत फक्त स्वताकरीता राजकारण करीत इतर पक्षासामोर लोटांगण घालत राहीले यावर मात्र चमचे ही बोलणार नाही
पंरतु स्वाभिमानाने सत्तेची दारे खुली करण्याचा प्रयत्न करणा-या मा.बाळासाहेंबावर टिका करतांना स्वताला डोक असुन बुध्दी नसल्याचे प्रमान देतांना काही स्वयंमघोषीत विद्वान लोक दिसत आहे
कुठलीही इलेक्शन आली की जानिवपुर्वक एकीकृत चा तुनतुना कासी लोक वाजवित असुन एकपक्ष एकसंघ होणा-या समाजामध्ये राजकीय दुफळी माजविण्याचा प्रयत्न केला जातो नंतर हेच लोक समाज एक होत नाही बोंबा मारतात अश्या लोकांन पासुन सावध राहा
मागील निवडनुकी मध्ये बाळासाहेबांन सोबत समाज पाठीशी उभा राहील्यामुळे प्रस्थापीतांना चळवळीवर आधारीत वंचित बहुजन आघाडी पक्षा ची दखल घ्यावी लागली . वंचित आघाड़ी चे वाढते प्रस्थामुळे काहींच्या बुडाला आग लागलेली आहे
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी सोबत एकपक्ष एकसंघ समाज झाला तर एकीकृत चा तुनतुना बंद होईल व स्वाभिमानी सर्वसामान्याचे राजकारण मजबुत होईल
त्यामुळे जेष्ठ , तथा युवक युवतींना समाजबांधवानी बहुजनंनाचा विकासाचा विचार करुन एकपक्ष एकसंघ होत वंचित बहुजन आघाडी पक्षा सोबत राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे अश्विन मेश्राम यांनी केले


0 टिप्पण्या