Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. शाळा कुडावळे भोईद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

रत्नागिरी: दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा विजया जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार सादर केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे भाषणे सादर केली. या स्पर्धेचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख धनंजय शिरसाट होते. याचवेळी चिमुकलीने "हा देश माझा याचे भान हे सुंदर गीत देखील सादर केले." त्यानंतर आपल्या डिजिटल शाळेसाठी मोलाचे सहकार्य केलेल्या सर्व देणगीदारांचा यथोचित सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आभार पत्र देऊन करण्यात आला.
     प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्वांसाठी गावच्या श्रीगणेश विकास मंडळ मुंबई यांच्यामार्फत अल्पोपहार व जिलेबीची सोय करण्यात आली. सदर मंडळाच्या सर्व तरुण सदस्यांच्या उपस्थितीने 
आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आल्याचे मुख्या.गजानन सामाले यांनी सांगितले,
   धनंजय शिरसाट यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.सुमधूर गीत गायन व वक्तृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेला गावाचा आधार मिळाला की अभिमान वाटावा अशी शाळा निर्माण होते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपली कुडावळे भोईद ही आदिवासी वाडीवरील शाळा होय असे प्रतिपादन शिरसाट यांनी अध्यक्षीय मनोगतात त्यांनी केले.
   सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच प्रमोद कदम, उपसरपंच रंजीत चाळके, सदस्या उज्वला रहाटवळ, गणेश विकास मंडळाचे अध्यक्ष श्याम लांबे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
   स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन सामाले यांनी तर उपशिक्षक नितेश मोतेवार यांनी सर्व उपस्थितांचे व श्री गणेश विकास मंडळाचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या