Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.उच्च प्राथमिक शाळा ,व ग्रामपंचयात गाढेगावपैठण येथे ७६वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

गौतम सोनवणे.जिल्हा विशैष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,

औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील गाढेगावपैठण ग्रामपंचायत व जिल्हा.परिषद,उच्च प्राथमिक शाळेमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रंसंगी शिक्षकासंह विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली.प्रजासत्ताक दिनाचा विजय असो,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,छत्रपती शिवाजी महाराज की जय,महात्मा गांधी की जय,अशा गगणभेदी घोषणांनी गाव परिसर दनाणुन गेला होता.यावेळी शालेय व्यावस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.जयश्री ताई सुनिल केदारे यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झेंडावंदन करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम भाषणे, नाटीका,गायण स्पर्धा,विविध कला दर्शन ईत्यादी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.तसेच ग्रामपंचायत गाढेगावपैठण येथे गावचे सरपंच किरण नाना केदारे यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झेंडावंदन करण्यात आले.यावेळी सरपंच किरण नाना केदारे, उपसरपंच देविचंद भवर,ग्रामसेविका श्रीमती वाघ मॅडम,ग्रामपंचायत सदस्या सौ माया ताई किरण केदारे,तंटामुक्त समिती अध्यक्ष भिमराव केदारे,शाळेचे मुख्याध्यापक श्री एकनाथ लाटे सर,सहशिक्षक श्री थोटे सर,श्री साखरे सर,श्री बटुळे सर,श्री दहिफळे सर,श्रीमती वाघ मॅडम,शालेय व्यावस्थापन समितीचे घनश्याम जराड यांची उपस्थीती होती.तर सुत्र संचालन श्री दहिफळे सर यांनी केले, व आभार प्रदर्शन श्रीमती वाघ मॅडम यांनी केले.यावेळी गावचे पोलीस पाटील यांच्यासंह शालेय व्यावस्थापन समितीचे सर्व सदस्य,रोजगार सेवक अरुण केदारे,दिलीप केदारे,ग्रामपंचायत शिपाई राजु शिंदे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या