Ticker

6/recent/ticker-posts

तुमसर तालुक्यात बिबट्याच्या दर्शनाने सायंकाळ होताच रस्ते होतात निर्मनुष्य

भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो. नं.9373472847

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात नियमित वाघ आणि बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून सायंकाळ होता तुमसर तालुक्यातील देवनारा परिसरातील रस्ते निर्मनुष्य होतात.त्यातच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यात देवनारा गाव शेजारी जंगल आहे.नाका डोंगरी वनपरिक्षेत्रात हा परिसर येतो.सातपुडा पर्वत रंगाचे घनदाट जंगल आहे.मध्यप्रदेशची सीमा सुद्धा लागून आहे.त्यामुळे या परिसरात वाघांसह वन्य प्राण्यांच्या मुक्त संचार होते.त्यातच देवनारा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.रस्त्याच्या शेजारी एक बिबट झुडपाखाली दडून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५: ३० वाजता दरम्यान तुमसर तालुक्यातील कुरमुडा वरून तुमसर कडे येत असताना देवनारा गावालगत जंगल व्याप्त झाडे झुडपात बिबट असल्याचे चार चाकी वाहन चालकाला दिसला.देवनारा परिसरात अंदाजे दोन वर्षाच्या वयाच्या बिबट तुमसर येथील निलेश डोंगरे व त्याच्या मित्रांना दडून बसलेला अवस्थेत दिसला.या बिबट्याच्या व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला.हा व्हिडिओ सध्या तुमसर तालुक्यात चांगलाच व्हायरल होत आहे.गत काही दिवसापासून तुम सर आणि मोहाडी तालुक्यात वन्यप्राणी शेत शिवारात फिरत आहे.दोन आठवड्यापूर्वी मोहाडी तालुक्यातील मांडे सर येथेवाघाला वन विभागाने शेतातून जेरबंद करण्यात आले होते.अशा परिस्थितीत शेतकरी शेतावर न जाता घरीच बसून आहेत.शेतकऱ्यांना शेतीचे कामे कशी करावी असा मोठा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.वन विभागाने शेतात फिरत असलेल्या बिबट यांच्या शोध घेणे गरजेचे आहे.असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.नाका डोंगरी परिक्षेत्रात परिसर येत असल्याने वन विभागाने ड्रोन द्वारे चौकशी करावी. त्वरीत बिबट्याला जेरबंद करावे अशी अपील केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या