Ticker

6/recent/ticker-posts

धुक्यामुळे रब्बी पिकांवर रोग आणि किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता


थंडीमुळे तालुका गारठला , शेकोट्यांचा आश्रय 
मनुष्याला ही सर्दी , खोकला , पडसे यासारखे विकार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा लाखनी - फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून गार हवेमुळे तापमानात घट झाली असून पहाटेच्या सुमारास धुक्याचे चादरिमुळे गहू व हरभरा ह्या रब्बी पिकांसह भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे .वातावरणातील बदलामुळे मनुष्याला सर्दी , खोकला, पडसे यासारखे आजार बढावले आहेत .थंडीमुळे शहरासह ग्रामीण जनतेने शेकोट्याचा आश्रय घेतल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे . 
       साकोली व लाखांदुर तालुक्याचा विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र 28 हजार 555 हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र 24 हजार 960 आहे त्यापैकी 22 हजार 631 हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर 6 हजार 747 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवट केली जाते. त्यात अन्नधान्य, कडधान्ये, गळीतधान्य, मसाला पिकांची लागवड केली जाते. अन्नधान्य पिकात गहु 1 हजार 14 हेक्टर, मका 74 हेक्टर, कडधान्यात हरभरा 1 हजार 262 हेक्टर, लाख, लाखोरी 1 हजार 330 हेक्टर, उडीद 548 हेक्टर, मुंग 520 हेक्टर, वटाणा 181 हेक्टर, पोपट 190 हेक्टर, मसूर 46 हेक्टर. गळीत धान्यात करडई 25 हेक्टर, भुईमूग 3. 5 हेक्टर, मसाला पिकात धने 97 हेक्टर, मिरची 47 हेक्टर कांदा 6.5 हेक्टर. भाजीपाला जन्य पिके 646 हेक्टर, पपई 2 हेक्टर, सोनबोरू 201 हेक्टर. चारापिके 187 हेक्टर असे एकुण 6 हजार 747 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे.
  मागिल तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरनासह थंडीच्या प्रकोपामुळे पहाटेपासूनच धुके पडल्याने रब्बी पिके व भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीची शक्यता तर तापमानात घट झाल्यामुळे शेकोट्यांचा आश्रय घ्यावा लागत आहे.   
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट (चौकट)*
माझ्याकडे ०.६० आर शेतजमीन असुन रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये त्यात गहू, हरभरा व भाजीपाला पिकाची लागवड केली होती. धुक्याचे चादरीमुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होणार असल्याची शक्यता आहे. 
*रमेश निरगुळे , प्रगतिशील शेतकरी*
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट (चौकट)*
कडाक्याची थंडी व धुक्याचे चादरिमुळे काही कडधान्य पिके, मसाला पिके व भाजीपालाजन्य पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, शेतक-यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीटकनाशक फवारणी करावी. 
*एम के जांभुळकर, कृषी अधिकारी प. स. लाखनी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या