Ticker

6/recent/ticker-posts

खेळाचे माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवन कौशल्याचे धडेमॅजिक बस इंडिया फाउंडेशन चा उपक्रम

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा लाखनी - शिक्षण व रोजगारासाठी मार्गदर्शन , स्वयंशासन व स्वावलंबी जीवन जगण्याचे कौशल्य विकसित करणे तथा बालविवाह टाळणे या त्रीसूत्रीच्या आधारे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या प्रकल्पामार्फत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिघोरी येथे शनिवारी ( ता ४) फूटबाल खेळाचे माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा सहायक अधिकारी हर्षवर्धन भांडारकर यांचे मार्गदर्शनात जीवन कौशल्याचे धडे देण्यात आले .
      लाखनी तालुक्यात मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चा स्किल प्रकल्प सुरू असून यात ६० शाळा आणि ८९ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत .या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना खेळाचे माध्यमातून जीवन कौशल्याचे धडे दिले जातात. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिघोरी येथील इयत्ता ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना शिकण्यातून शिकणे हे जीवन कौशल्य आहे त्यांना पकडा आणि हेल्पर फूटबाल या खेळाचे माध्यमातून शाळा सहायक अधिकारी हर्षवर्धन भांडारकर यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षित शिक्षिका ललिता तागडे यांनी या सत्राचे नेतृत्व करून जीवन कौशल्याबाबाद मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक प्रमोद हटेवार, समुदाय समन्वयक सूरज सूर्यवंशी ,अश्विनी रणदिवे , सहायक शिक्षिका ज्योती राऊत ,गीता बोरकर ,मीरा वंजारी यांचेसह इयत्ता ५ ते ७ चे विद्यार्थी सहभागी झाले होते .या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य विकसित होणार असल्याचे मुख्याध्यापक प्रमोद हटेवार यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या