कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
वैद्यकीय अधिकारी डॉ प्राजक्ता कापगते यांचे प्रतिपादन
भंडारा लाखनी - तंबाखू सेवनाने दरवर्षी सुमारे १.३० दशलक्ष तर प्रती दिवस ३हजार ५०० व्यक्तींचा मृत्यू होतो .कर्करोग टाळायचा असेल तर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणे बंद करावे याशिवाय विद्यार्थ्यांनी तंबाखू सेवन व धूम्रपान करू नये असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषद हायस्कूल तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरमाडी/तूप येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती रॅलीस मार्गदर्शन करताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्राजक्ता कापगते यांनी केले आहे .
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरमाडी/तूप द्वारा जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून " तंबाखू मुक्त शाळा अभियान " अंतर्गत जनजागृतीसाठी गावात विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तीचे शपथ घेतली.या रॅलीत मुरमाडीचे सरपंच सुषमा प्रकाश चुटे , झरप /कोलाराचे सरपंच जगदीश भोयर , शाळा समिती सदस्य डॉ युवराज मोटघरे , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्राजक्ता कापगते , सोमेश्वर पाल , डी.एस . काळे , व्ही.बी. शिंदीमेश्राम , संजय भोयर , बी.बी. चूटे, के.आर.अवसरे , ए. व्हीं.गणवीर , वृंदा नंदेश्वर , सरिता मुळे, विशाखा भेंडारकर , सरिता शेंडे , शारदा मरसकोले , सहभागी झाल्या होत्या . मान्यवरांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम , कर्करोगाची कारणे व त्यावरील उपाय याबाबद विद्यार्थ्यांनी सावधगिरी कशी बाळगावी याबाबद मार्गदर्शन केले . रॅलीतील कर्करोगाबाबद फलक व घोषणा गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते . तंबाखूमुक्त शाळा अभियान व रॅलीच्या यशस्वीतेसाठी अनिल इनवाते , गीता मंगरुळकर व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या