Ticker

6/recent/ticker-posts

पाटोदा ग. ता. जामखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षकांचा सन्मान

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-   आज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा ता जामखेड येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सत्काराचे वैशिष्ट्ये दिनांक 28 /1 /2023 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन कार्यक्रम झाले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याने सांस्कृतिक कार्यक्रम केल्यामुळे पाटोदा गावचे माजी सरपंच तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समीर खान पठाण यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान केला. कारण की लहान लहान विद्यार्थ्यांवर अतिशय दहा ते पंधरा दिवस कष्ट करून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेता आला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम गावकऱ्यांसमोर करून दाखवला त्याबद्दल शिक्षकांचे माजी सरपंच समीर भाई पठाण यांनी कौतुक म्हणून सन्मान केला.
 याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक अनिल थोरात सर दिलीप मोरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वडवकर मोहिदिन सय्यद विष्णू भवर पाटील बंडू गव्हाणे माजी उपाध्यक्ष प्रवीण टापरे दीपक समुद्र राजाभाऊ सासवडकर मुख्याध्यापक उत्तम पवार सर हजारे मॅडम कुमटेकर मॅडम राठोड मॅडम गावातील नागरिक उपस्थित होते.
 याप्रसंगी अनिल थोरात सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून जे माजी सरपंच समीर भाई पठाण यांनी शिक्षकांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांनी पठाण यांना धन्यवाद दिले त्याच पद्धतीने दिलीप मोरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचे कौतुक केले व समीर भाई पठाण यांनी जो छोटे खाने सत्कार केला.  त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले माजी सरपंच समीर भाई पठाण यांनी जे शिक्षकांनी कष्ट केले विद्यार्थ्यांना घडवण्याचे त्याबद्दल शिक्षकाचे आपल्या मनोगतामधून अभिनंदन केले.
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श मुख्याध्यापक उत्तम पवार सर यांनी सुत्रसंचलन केले व हजारे मॅडम यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या