भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो. नं.9373472847
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका अंतर्गत येणारे मौजा जांभोरा येथे १.६९खर्चाच्या पाणी पुरवठा योजना मंजूरी मिळाली.दोन महिन्यापूर्वी बांधकामाची टेंडरची प्रक्रिया होऊन वर्क ऑर्डरही काढण्यात आले.परंतु अद्यापही बांधकामाला सुरुवात झालेली नाही.गावात पिण्याचे पाण्याची समस्या गंभीर असताना लोकांमध्ये हळहळ सुरू आहे.जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभाग व कंत्राटदारांचे दुर्लक्ष का ? असा प्रश्न विचारला जात आहे. तातडीने कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.येथील जुनी पाणीपुरवठा योजना अकार्यक्षम ठरल्याने गावात पाण्यासाठी महिलांना भटकावे लागते.शेत शिवारातील विहिरी वरून पाणी आणण्यासाठी कष्ट करावा लागत आहे. जणू काही तारेवरची कसरत करतात.या गावातील जुनी पाईप लाईन पूर्णतः नादुरुस्त दिसतो आहे.पाण्याची टाकी सुद्धा निरुपयोगी दिसत आहे.गावाला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होणे गरजेचे होते.त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याची टाकी निर्लेखीत करण्यात आली.गावाची मुलभूत समस्या सुटावी म्हणून तत्कालीन सरपंच भुपेंद्र पवनकर यांनी वारंवार पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांना यश आले. २०१८ मध्ये जांभोरा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १ कोटी ६९ लाख रुपयांची योजना मंजूर झाली.परंतु उन्हाळा ऋतूला लवकरच प्रारंभ होणार असताना बांधकामात विलंब का ? अशा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर पुढे येत आहेत. म्हणून जांभोरा या गावात पिण्याचे पाण्याची समस्या त्वरित निकाली करण्यात यावी अशी मागणी केली आहे.असा प्रश्न गावकऱ्यांनी मिळून उपस्थित केला आहे.
0 टिप्पण्या