Ticker

6/recent/ticker-posts

आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या १९१ व्या पुण्यतिथीनिमित्त वंचित बहुजन आघाडी उमरगा च्या वतीने अभिवादन.


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो, 9860179256


उस्मानाबाद :- दिनांक ३/२ /२०२३ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे आद्य क्रांतिकारकनरवीर राजे उमाजी नाईक यांच्या 191 व्या पुण्यतिथी निमित्त उमरगा येथे नगरपरिषद कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले .
प्रथमतः विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे नवीन तालुका उपाध्यक्ष प्रशांत सांगवे नारंग वाडीकर व शाम पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर आद्य क्रांतिवीर राजीव उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले .
माननीय कैलास जी शिंदे सतीश भाऊ सरवदे यांच्याही हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच याप्रसंगी कमलाकर सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका अध्यक्ष बाबुराव शहापुरे (मामा) तसेच आप्पाराव गायकवाड माडजकर तसेच इतर पदाअधिकारी उपस्थित होते तसेच वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार तालुका उपाध्यक्ष अनंत कुमार,कांबळे,प्रशांत सांगवे, नेताजी गायकवाड तालुका सहसचिव सुरेश मामा औरादकर, हरिभाऊ बनसोडे,बाबासाहेब सुरवसे,सागर कांबळे,दत्तात्रय मोरे , सतीश टोपगे,गौतम गुरुजी , अभिमन्यू भोसले तसेच भिमराष्ट्र ग्रुप तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड तालुका उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, वाहिद आंबुलगे,शिवाजी जाधव, अभिजीत शिंदे,तानाजी सूर्यवंशी बादने साहेब कंटेकुर,विठ्ठलराव बोकले आदींची उपस्थिती होती.
तसेच सर्व उपस्थित त्यांचे आभार तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांनी व्यक्त केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या