धुळे -:८ मार्च हा "जागतिक महिला दिन" म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. समाजात महिलांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यात भारतीय महिलांचे योगदानही विसरता येणार नाही. झाशीची राणी, इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, कल्पना चावला, हिरकणी,
आहिल्याबाई होळकर अशा कितीतरी अनेक महिलांनी आपल्या समाजात नवीन दिशा देण्याचे कार्य केलेले आहेत. म्हणून समाजातील विविध जनमानसात त्यांची प्रेरणा घेत अशाच सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण ,राजकीय, कृषी, क्रीडा,विज्ञान तंत्रज्ञान, व्यावसायिक, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून समाजात एक आदर्श निर्माण करणार्या कर्तबगार महिलांचा "महिला रत्न पुरस्कार" नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत तर्फे गौरविण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळा प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते धुळे येथे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरस्कार साठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी अधिक माहितीसाठी कार्यक्रम अधिकारी श्री प्रमोद पाटील मोबाईल नंबर ९८८११९४८१६ आणि प्रिया पाटील ७०३०७७७८४८ यांच्याशी संपर्क करावे. नामांकन पाठवण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी आहे.
0 टिप्पण्या