Ticker

6/recent/ticker-posts

4 जून रोजी महाराष्ट्र राजपत्रीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023


प्रतिनिधी चित्रा न्युज
सातारा : – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही 4 जून 2023 रोजी जिल्ह्यातील 26 उपकेंद्रावंर घेण्यात येणार आहे. या उपकेंद्रांच्या 100 मीटरच्या परिसरात क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.

          जिल्ह्यातील अभयसिंह राजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शाहूनगर शेंद्रे, सातारा, अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, सदर बझार, कॅम्प, सातारा, कन्या शाळा, 155 अ/ब, भवानी पेठ, सातारा, लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज, 17 मल्हारपेठ, सातारा, महाराजा सयाजीराव विद्यालय ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा, न्यू इंग्लिश स्कूल, सोमवार पेठ, सातारा, अनंत इंग्लिश स्कूल, मंगळवार पेठ, सातारा, यशोदा टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, राष्ट्रीय महामार्ग 4 जवळ, वाढे फाटा, सातारा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सदर बझार, कॅम्प, सातारा भाग –अ, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सदर बझारा, कॅम्प भाग – ब, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पानमळेवाडी, पो.वर्ये, ता.जि.सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील पोलिटेकनिक, पानमळेवाडी, पो.वर्ये, ता.जि.सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज, सदर बझार कॅम्प, सातारा, भावनी विद्यामंदिर ॲन्ड ज्यूनिअर कॉलेज, 17 मल्हार पेठ, सातारा, कला व वाणिज्य महाविद्यालय, 117 अ/1,2,3 कोटेश्वर मैदानासमोर, शुक्रवार पेठ, सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सदर बझार, आरटीओ ऑफिस शेजारी, सातारा, सौ. सुशिलादेवी साळुंखे माध्यमिक विद्यालय, 17 मल्हार पेठ, सातारा, श्रीपतराव पाटील हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज,  करंजेपेठ, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नं 43, प्लॉट नं. 1 व 2, पंडीत पार्क, तामजाईनगर, करंजे पेठ, सातारा, सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, विद्यानगर, कराड, ता. कराड, जि. सातारा, भाग अ, सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, विद्यानगर, कराड, ता. कराड, जि. सातारा भाग ब, एस.एम.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, प्लॉ. न. 222, मंगळवार पेठ, ता. कराड, जि. सातारा, टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्लॉट नं. 222, मंगळवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा, यशवंत हायस्कूल कराड, ता. कराड, जि. सातारा, यशवंतराव  चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर, कराड, ता. कराड, जि. सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सदर बझार, कॅम्प, सातारा या 26 उपकेंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

          या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मीटरच्या परिसरात दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजलेपासून सायं. 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू असेल. त्यानुसार परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई असेल, तसेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. विद्यालय, महाविद्यालय परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी. बुथ, आय.एस.डी. बुथ, फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायलेस सेट, ट्रांन्झिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, वापरण्यास, जवळ बाळगण्यास, परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई असले.

00000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या