Ticker

6/recent/ticker-posts

"हर घर नल से जल " जल जिवन मिशन मौजा आमगाव व गिरोला येथे संपन्न - खासदार श्री. सुनील मेंढे


भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मौजा गिरोला व आमगाव येथे  मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “हर घर नल से जल” जल_जीवन_मिशन अंतर्गत भंडारा तालुक्यातील मौजा आमगाव व मौजा गिरोला येथे विकास कामांचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाले.
भंडारा तालुक्यातील मौजा आमगाव येथे जल_जीवन_मिशन अंतर्गत नळ जोडणी द्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याकरिता ₹ ३५ लक्ष किमतिंच्या कामांचे भुमिपुजन मा. खासदार श्री. सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मौजा गिरोला येथे म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपुजन संपन्न झाले.

       या योजनेमुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा अनेक मैलांच्या प्रवासाला आता पूर्णविराम दिला जाणार आहे. गोरगरीब ग्रामीण जनतेला पाणीटंचाईमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करून  पाइपलाइनद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचे मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी समस्त ग्रामस्थांशी संवाद साधला.मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घोषित केलेल्या योजनांची माहिती दिली व या योजनांचा लाभ घ्यावा असे उपस्थित लोकांना आवाहन केले.

याप्रसंगी सर्वश्री जि.प.सदस्य विनोदजी बांते, जिल्हा महामंत्री प्रशांतजी खोब्रागडे, खरबी ग्रामपंचायतचे सरपंच गणेशजी मोथरकर, उपसरपंच चिखली राजेशजी वाघमारे, शक्ती केंद्र प्रमुख भाजपा कैलासजी मेहर, बंडूजी सार्वे व ग्रामवासी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या