भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847
गोंदिया : गोरेगाव - दि ३१ मे
तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक ३१ मे ला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रम निमित्त शासननिर्णयानुसार ग्रांम पंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास व सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. यात संध्या सुनिल बघेले व पुनम योंगेंन्द्र बिसेन यांना देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे होते. पुरस्कार वितरक गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मनजी भगत यांच्या हस्ते देण्यात आले प्रमुख अतिथी गोरेगाव कूर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यु.टी.बिसेन साहेब, तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले,आर एफ पारधी सर, उद्योगपती कमलेश पटेल,चुळामन पटले, शिवराम मोहनकार, अंगणवाडी सेविका मंगला चौव्हाण, निर्मला भोयर,बघेले बाई, कविता चाचेरे,ललिता कावडे आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी राजमॉता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्य वर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रांम पंचायत सचिव पी बी टेंभरे यांनी केले.


0 टिप्पण्या