प्रतिनिधी चित्रा न्युज
बुलढाणा:- जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नायदेवी या ग्रामपंचायतच्यावतीने वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रम पाणलोट विकास समितीच्यावतीने करण्यात आला असून आजपर्यतच्या बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अश्या पद्धतीने शेती उपयोगी वस्तूचे वाटप झाल्याने सदर ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गावात 'वंचित'चा सरपंच -
बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत जिथे ओपन जागेवर मागासवर्गीय महिला सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. यावेळी साहेबराव तायडे, किरण मोरे, प्रशांत वाघोदे, मिलिंद वानखेडे, आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या