भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा रोहा येथील कमलेश बांडेबुचे यांनी मित्र मंडळी सोबत सिनेमा स्टाईलने वाढदिवस साजरा केला.
अलीकडे वाढदिवस सिनेमे स्टाईल साजरा करण्याची पद्धत रूढ होत आहे. त्यातच आपला वाढदिवस वेगळा असावा या विचारातून तरुण मंडळी वाढदिवसाचे केक तलवारीने कापून साजरा करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या गंभीर प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. त्यानंतर गुन्हे दाखल करून तलवार जप्त करण्यात आली. मोहाडी तालुक्यातील मौजा रोहा येथील कमलेश बांडेबुचे याचा २८ में रोजी वाढदिवस होता. त्यासाठी मित्रमंडळीने ११ केक आणले. त्या केकवर कमलेश सेठ असे नाव लिहले होते. हे ११ केक एका रांगेत टेबलवर ठेवण्यात आले. त्यानंतर आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर कमलेश ने सरळ रेषेतील केक एकएक करीत तलवारीने कापले. दरम्यान एका मित्राने उपस्थितांपैकी केक कापण्याचा व्हिडीओ मोबाइल मध्ये बनविला. हा व्हिडिओ कमलेशने स्वतःच्या स्टेटस वर ठेवला. या व्हिडिओमुळे कमलेश अडचणीत आला आहे. तलवारीने केक करण्याचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले. तलवार जप्ती करून आणि त्यांना समज देऊन सोडण्यात आले.


0 टिप्पण्या