Ticker

6/recent/ticker-posts

माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी...जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य
मो. नं. 7058137098

अहमदनगर :-   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी होत आहे. स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. याच दरम्यान आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, ३१ मे रोजी शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी होत आहे. स्वागताध्यक्ष आ. प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. अश्यातच आ. प्रा.राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ मे रोजी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कामाची तयारी करण्याकरिता चोंडी येथे गेलो होतो. त्यावेळी मला सागर गवसणे याच्या मोबाईलवरून मला फोन आला त्यावेळी तो मला म्हणाला की, तुम्ही आ. प्रा.राम शिंदेच्या जवळ आहात, त्यांना जुळवून घ्यायला सांगा, नाहीतर पाहून घेईन असे म्हणाला. त्यावेळी मी काहीही न बोलता फोन कट केला. त्यानंतर मी आ. राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व सागर गवसणे याने फोन केल्याची माहिती दिली.
या धमकी प्रकरणी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित तरुणाने समाज माध्यमाचा आधार घेत ही धमकी दिली आहे. त्यामुळे जामखेडसह राज्यात खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुभाष गवसणे रा. पिंपळगाव उंडा, ता जामखेड याच्या विरूद्ध भादवी कलम 504, 505 (2), 506 (2) नुसार जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी बोस हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या