Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम पंचायत कार्यालय मौजा मांडेसर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी


भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथे आज दिनांक ३१ मे २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या गावातील महिलांच्या सत्कार करण्यात आला. 
सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला विधिवत पूजा अर्चना करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.  त्यानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रणी स्थानावर काम करणाऱ्या दोन महिला बचत गटातील महिलांचे सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सौ. मालती हितेश भसगवळे ( ICRP )सावित्रीबाई फुले स्वयंसहायता समूह मांडेसर, सौ.लक्ष्मी रूपचंद सव्वालाखे ( ICRP )नारीशक्ती स्वयंसहायता समूह रामपूर / मांडेसर या दोन महिलांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र, मानचिन्ह देऊन अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गुलाबजी सव्वालाखे ( सरपंच ग्रा.पं. कार्यालय मांडेसर ) श्री. रोशनजी लिल्हारे ( उपसरपंच ग्रा.पं. कार्यालय मांडेसर ) श्री. सतीश एच. गिते (ग्रामसेवक ग्रा.पं. कार्यालय मांडेसर ) श्री. मुकेश एम. भसगवळे (संगणक परिचारक ग्रा. पं. कार्यालय मांडेसर ) सौ. कामिनाबाई दमाहे ( सदस्या ग्रा.पं. कार्यालय मांडेसर ) सौ. कुकवंताबाई सव्वालाखे ( सदस्या ग्रा.पं. कार्यालय मांडेसर ) सौ.प्रमिलाबाई दमाहे (अंगणवाडी सेविका मांडेसर ) सौ.शालू ताई सव्वालाखे (अंगणवाडी सेविका रामपूर )ग्रामपंचायत कार्यालयाचे शिपाई श्री. रामदासजी चन्ने, श्री.  फत्तेसिंगजी मलाधारी, श्री. आशिष सव्वालाखे व गावातील सर्व आदरणीय मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या