Ticker

6/recent/ticker-posts

पवनी येथील जनता दरबारात विविध विषयांच्या अनेक तक्रारी :- खासदार श्री सुनील मेंढे

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्हा पवनी तालुक्यातील विविध समस्या घेऊन त्या सोडविल्या जातील या आशेने आलेल्या तालुक्यातील असंख्य नागरिकांचे आज समाधान केले. पवनी तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित जनता दरबारात अनेक समस्या मांडल्या गेल्या. पवनी तालुक्यातील नागरिकांसाठी वात्सल्य सभागृहात आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. सहज सुटणाऱ्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या. 
या प्रसंगी सर्वश्री जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिर्हेपुंजे, अनुपजी ढोके महामंत्री भाजमूयो, मोहनजी सुरकर तालुका अध्यक्ष, मछिंद्रजी हटवार शहर अध्यक्ष, शिवशंकरजी मूंगाटे सरपंच अद्याळ, सुवर्णाताई मूंगाटे, चौधरी साहेब तहसीलदार, राठोड साहेब SDO भंडारा, अनुराधाताई बुराडे, माधुरीताई नखाते, सिंगणजुडे साहेब पोलीस निरीक्षक, प्रकाशजी कुर्झेकर, सर्व विभागाचे कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या