सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड तालुक्यातील नान्नज येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शहाजी रामचंद्र राजेभोसले यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यांच्या आंदोलनाला नान्नज ग्रामस्थांसह विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे.
शहाजीराजे भोसले यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी नान्नज गाव रविवारी, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत नान्नज ग्रामस्थांच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या बंदमध्ये नान्नज येथील किरकोळ व घाऊक दुकाने, बाजारपेठ, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा देण्यात येणार आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय सेवा, रुग्णालये, औषधांची दुकाने तसेच दूध पुरवठा या सेवांचा समावेश असून, या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
शांततेत बंद पाळण्याचे आवाहन
नान्नज ग्रामस्थांच्या वतीने हा बंद शांततेत, संयमाने आणि लोकशाही मार्गाने पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन शहाजीराजे भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहाजीराजे भोसले यांनी मांडलेल्या मागण्या रास्त व जनहिताच्या असून, प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, नान्नज बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जामखेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना निवेदनाची प्रत देण्यात आली असून, आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या आंदोलनाची आणि प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे,
या उपोषणास व आंदोलनास, बोर्ले, जवळके,वाघा, चोभेवाडी, गुरेवाडी, राजेवाडी, पोतेवाडी, महारुळी, सोनेगाव, धनेगाव, या गावातील सर्व ग्रामस्थांनी या प्रमुख मागणीसाठी जाहीर पाठिंबा दिला असून तातडीने या सर्व प्रमुख मागण्यांची शासनाने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात आशी मागणी करण्यात आली आहे
उस्ताद गृप या संघटनेने नान्नज येथील उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे.
चौकट - १) यावेळी बोर्लेचे मा उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी या प्रमुख मागण्यांसाठी जाहीर पाठिंबा दिला असून ह्या सर्व सामान्य नागरिकांच्या मुलभूत सुविधासाठी उपोषण सुरू असून या मध्ये राजकीय किंवा कोणत्याही पक्षाचा व वैयक्तिक हितासाठी शहाजी राजे भोसले यांनी उपोषण सुरू केले नसून ते सर्वोसाठी आसल्याने आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे.


0 टिप्पण्या